Saturday, March 29, 2025
Homeक्रीडायेवला तालुक्यातील अश्विनीची दोन सुवर्णपदकांना गवसणी

येवला तालुक्यातील अश्विनीची दोन सुवर्णपदकांना गवसणी

पाटोदा | वार्ताहर

पाटोदा येथील अश्विनी संजय बोरणारे हिला पुणे विद्यापीठ तर्फे दरवर्षी एम फार्मसी मध्य विद्यापीठातून पहिले येणाऱ्या व्यक्तीसाठी दिले जाणारे दोन सुवर्णपदके जाहीर झाल्याच नुकताच पुणे विद्यापीठाने पत्राद्वारे कळवले आहे.

- Advertisement -

अश्विनी बोरणारे हिने ग्रामीण भागात मराठी शाळेमध्ये पाटोदा येथे दहावीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले व उच्च माध्यमिकचे बारावीपर्यंतचे शिक्षण कोपरगाव येथील एस.एस.जी.एम कॉलेज येथे पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणासाठी फार्मसी हा विषय निवडला.

मराठी माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेऊनही नाशिक येथील अंजनेरी जवळील सपकाळ नॉलेज सिटी या मोठ्या कॉलेजमध्ये गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवला.

बी.फार्मसी व एम.फार्मसी मध्ये जिद्द व चिकाटीने अभ्यास करून महाविद्यालयात पहिला येण्याचा विक्रम केला. नुकतंच पुणे विद्यापीठाने एका पत्राद्वारे त्यांना पुणे विद्यापीठातर्फे एम.फार्मसीच्या शेवटच्या वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिल्या येणाऱ्या व्यक्तीसाठी दिल जाणार स्व.डॉ. शिवराम उर्फ गोपाळकृष्ण भडभडे लक्ष्मेश्वर स्वर्णपदक व डॉ.शिवाजीराव कदम सुवर्णपदक जाहीर झाल्याचे कळवले.

त्यांना एम फार्मसी च्या अभ्यासक्रमात प्रा.डॉ. गोंदकर, प्रा.डॉ. दरेकर व प्राचार्य डॉ. सौदागर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या निवडीबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन पर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नेहरू युवा केंद्र येवला व छत्रपती शाहू महाराज शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने ही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 GT vs MI : आज मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स भिडणार;...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (शनिवारी) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघासमोर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे आव्हान असणार आहे. हा...