अकोले |प्रतिनिधी| Akole
शहराजवळील पानसरवाडी येथील टेकडीवर दोन गटांत धुमश्चक्री झाली. याप्रकरणी अकोले शहर पोलिसांत दोन गटांतील तब्बल 19 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहे.
आमच्या विरोधात तहसील कार्यालयात तक्रार का देतो? याचा राग मनात धरून शरद सखाराम पानसरे (वय 49) यांना तब्बल दहा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ गेली. याप्रकरणी त्यांनी अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सुनील सूर्यभान पानसरे, अर्जुन नथू पानसरे, दिनेश गोविंद पानसरे, संपत चंद्रभान पानसरे, शुभम सुनील पानसरे, सागर रोहिदास पानसरे, सचिन सुनील पानसरे, अभिषेक संपत पानसरे, सार्थक गोपीनाथ पानसरे, प्रसाद शरद सुरशे (सर्व रा.पानसरवाडी, अकोले) यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दिनेश गोविंद पानसरे (वय 41) हे भांडण सोडवणार्यांमध्ये गेले असता त्याचा राग मनात धरून तब्बल नऊ जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. यावरून परशुराम बाळचंद शेळके, शरद सखाराम पानसरे, रोहिदास लक्ष्मण पानसरे, अशोक सखाराम पानसरे, समीर दिगंबर नाईकवाडी, अक्षय प्रदीप पानसरे, दिगंबर विठ्ठल नाईकवाडी, सुशांत शरद पानसरे, सुरेश बाळचंद शेळके (सर्व रा. पानसरवाडी, अकोले) यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. महेश आहेर हे करीत आहे.