Tuesday, May 20, 2025
Homeधुळेधुळ्यात नगावबारी परिसरात धुमश्चक्री ; गोळीबारची चर्चा

धुळ्यात नगावबारी परिसरात धुमश्चक्री ; गोळीबारची चर्चा

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

शहरातील देवपूर (Devpur) भागातील नगावबारीत आज दोन गटात तुफान धुमश्चक्री उडाली. एकमेकांना मारहाण झाली, त्यात हत्यारांचाही वापर करण्यात आला. याबरोबरच पिस्टलद्वारे फायर झाल्याचीही जोरदार चर्चा होती.

दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. नगांवबारी परिसरातील कदमबांडे नगरात अष्टकोनी ओटा येथे मागील भांडणाच्या कारणावरून एका टोळीचा प्रमुख आणि नेहरु नगरातील गट आज दुपारी आमने सामने आले. यावेळी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. त्यात हत्यारांचाही वापर आणि गोळीबार ही झाल्याची जोरदार चर्चा आहे.

या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांचा (police) मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर संशयीतांची धरपकडची सुरु करण्यात आले आहे. दरम्यान या दोन्ही गटात यापूर्वी देखील हाणामारी झाली आहे. त्यांच्यावर देवपूर पोलिसांत गंभीर गुन्हेही दाखल आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

0
नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा...