Saturday, July 27, 2024
Homeनगरदोन गटातील वादात पुतळा विटंबना

दोन गटातील वादात पुतळा विटंबना

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा फाटा येथे झालेल्या दोन गटातील वादात जाणून बुजून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यातील विटंबना करणार्‍यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेवासा काँग्रेसने पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की, नेवासा फाटा येथील नेवासा ते नेवासा फाटा मार्गालगत असलेल्या व्यापारी गाळ्याच्या वादावरून दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली यावेळी दोन्ही गटाकडून मारहाण झाली. या मारहाणीत एका गटाने गाळ्यात ठेवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जाणूनबुजून फोडून टाकली. पोलीस प्रशासनाने देखील गुन्हे दाखल केले. पोलीस प्रशासनाने निष्पक्ष तपास करून तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणार्‍यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचेकडे केली.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी हिंदू व मुस्लिम समाजात जातीय तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने हे पूर्वनियोजित घटना घडून आणली. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहे त्यामुळे यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या