Tuesday, April 29, 2025
Homeनंदुरबारमोग्राणी येथे आगीत दोन घरे जळून खाक

मोग्राणी येथे आगीत दोन घरे जळून खाक

नवापूर ।Navapur । श.प्र.

यंदा कडाक्याच्या थंडीनंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उन्हाचा तडाखा वाढताना दिसून येत आहे. गेल्या आठवड्याभरात धावत्या वाहनांना आग(fire) लागून जळण्याचे प्रकार समोर आले असतानाच. आज दुपारी नवापूर तालुक्यातील मोग्राणी गावात दोन घरांना (Two houses) अचानक आग लागून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

- Advertisement -

अधिक माहिती अशी कि, नवापूर तालुक्यातील मोग्राणी रहिवासी लक्ष्मण सामा वळवी व लालसिंग अर्जुन पाडवी यांची घरे एकत्र होती. सुरुवातीला एका घराला आग लागल्यानंतर उष्णता व हवेमुळे आगीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने दोन्ही घरे जळून खाक झाली आहे. या आगीमध्ये घरातील धान्य, कपडे, घरगुती सामान व फर्निचर लाकडी दांड्या, खांबे सर्व जळून भस्म झाले आहे.

आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग एवढी भीषण होती की आग विझविणे कठीण झाले. धान्यासह कपडे व सर्व संसार उपयोगी वस्तू आगीमुळे जळून खाक झाल्याने दोन्ही परिवार उघड्यावर आले आहे. घरांना आग लागल्यानंतर नागरिकांनी बाहेर पडून आपला जीव वाचविला त्यामुळे जीवित हानी टळली आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिकांनी नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन सदर कुटुंबांना महसूल विभागाने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अचानक लागलेल्या या आगीत घरातील सर्वसामान जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार;...

0
मुंबई | Mumbai राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...