Wednesday, September 11, 2024
HomeनाशिकNashik : भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप उलटली; दोघे जखमी

Nashik : भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप उलटली; दोघे जखमी

दहिवड | प्रतिनिधी | Dahiwad

आज शनिवार (दि.१५ जुलै) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास देवळा-सौंदाणे रस्त्यावर ( Deola-Saundane Road) मेथीची भाजी घेऊन जाणारी पिकअप गाडी उलटल्याने (Pickup overturned)अपघात (Accident) घडला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील (Deola Taluka) वाखारी येथून पिकअप गाडी क्रमांक (एम.एच.१५ जी. व्ही. ८५७२) ही मेथीची भाजी घेऊन नागपूरच्या (Nagpur) दिशेने जात होती.

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; ‘या’ भागांत मुसळधार कोसळण्याचा अंदाज

त्यावेळी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मेथीच्या भाजीने भरलेली पिकअप गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. यात चालक समाधान सुपडू उशिरे यांच्यासह काहीजण किरकोळ जखमी (Injured) झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी (Citizens) घटनास्थळी धाव घेत मदत केली. तसेच ही पिकअप गाडी वाखारी पिंपळगावची (Vakhari Pimpalgaon) असून गाडी मालक प्रकाश मुरलीधर सोनजे हे असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

पावसाळी अधिवेशनाआधीच मविआ आक्रमक; उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

- Advertisment -

ताज्या बातम्या