Saturday, May 4, 2024
Homeनाशिकदोन लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेच्या प्रवाहात आणणार

दोन लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेच्या प्रवाहात आणणार

नाशिक | Nashik

करोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात अंतीम परिक्षा घेण्यात याव्यात व त्याचे स्वरूप विद्यापीठांनी निश्चित करावयाचे असल्याने विद्यापीठांना शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याची भुमिका राज्य शासनाची असून त्या अनुषंगाने…

- Advertisement -

राज्यभरात विद्यापीठांना भेटी देवून त्यांच्या परिक्षा पद्धतीची रूपरेषा, पूर्वतयारी व परिक्षांच्या नियोजनात शासनाचा सहभाग यांची सांघड महत्वाची असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ९१ हजार म्हणजे सुमारे २ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणणार असून त्यासाठी विद्यापीठाला शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

आज यशवंतराव चव्हाण माहाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यश ईन सभागृहात परिक्षांबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. सामंत बोलत होते.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश बोंडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. सामंत म्हणाले, यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी खासदार शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून आजच्या २५ वर्षांपूर्वी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर देशभर मुक्त शिक्षण प्रणालीचा विस्तार होत गेला.

आज १६१ अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ९१४ विषयांचे जवळ जवळ ६ लाख २७ हजार विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्यातील अंतीम वर्षांची परिक्षा देणारे १ लाख लाख ९१ हजार विद्यार्थी आहेत, त्यासाठी ऑनलाईन परिक्षा पद्धतीच्या माध्यमातून १० लाख ४१ हजार परिक्षा घ्यावयास लागणार आहेत. ही परिक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असून विद्यार्थी आहे.

तिथून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉप, संगणक तसेच त्यांच्यकडे इंटरनेट कनेक्टिविटीसह उपलब्ध असलेल्या डिव्हाइस अथवा साधनाद्वारे ते देवू शकतील.त्यासाठी आवश्यक असलेली पूर्व प्रक्रिया विद्यापीठामार्फत सुरू असून ती अंतीम टप्प्यात आहे.

त्यातील ४० हजार विद्यार्थी ऑफलाईन पर्याय निवडतील असा विद्यापीठाचा अंदाज आहे. परंतु डिजिटल व ऑनलाईन शिक्षणाचा राज्यातला पहिला प्रयोग विद्यापीठाने सर्वप्रथम राज्यात राबवला, यशस्वी केला.

आज तोच प्रयोग करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच विद्यापीठांना अंगिकार करावा लागतोय ही शासनाद्वारे स्थापित विद्यापीठाची सर्वात मोठी उपलब्धी असून त्यामुळे विद्यापीठातील अंतीम वर्षांची परिक्षा देणारे १०० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या परिक्षापद्धतीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री श्री. सामंत यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या