Tuesday, September 17, 2024
Homeदेश विदेशजम्मू विमानतळावर दोन स्फोट; स्फोटासाठी ड्रोनचा वापर

जम्मू विमानतळावर दोन स्फोट; स्फोटासाठी ड्रोनचा वापर

जम्मू | Jammu

- Advertisement -

जम्मूमधील (Jammu) एअर फोर्स स्टेशनच्या (IAF) उच्च सुरक्षा असलेल्या भागामध्ये आज दोन बॉम्बस्फोट झाले आहे. कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही झालेल्या या स्फोटांमुळे चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान स्फोटात कोणीही जखमी किंवा कोणतंही नुकसान झालं नसल्याचं भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आलं आहे.

५ मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. पहिला स्फोट रात्री १:३७ वाजता आणि दुसरा १:४२ वाजता झाला आहे.

धक्कादायक म्हणजे जम्मू एअरबेसवर (Jammu air base) स्फोट घडवण्यासाठी दोन ड्रोनचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’

पहिल्या स्फोटामध्ये इमारतीच्या छताचे नुकसान झाले. दुसऱा स्फोट मोकळ्या जागेत झाला. एअर फोर्स स्टेशनमध्ये पार्क करण्यात आलेले विमान हल्लेखोरांच्या टार्गेटवर असू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या