Tuesday, August 25, 2026
HomeनगरDomestic violence case : छळाला कंटाळून दोन विवाहित महिलांची पोलीस ठाण्यात धाव

Domestic violence case : छळाला कंटाळून दोन विवाहित महिलांची पोलीस ठाण्यात धाव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विवाहित महिलांनी सासरच्या लोकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून पोलीस ठाण्यांत धाव घेतली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये महिलांच्या सासरच्यांविरोधात तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बोल्हेगावातील एका महिलेचा दिड लाखांच्या मागणीसाठी छळ करण्यात आला. पीडित महिलेने सुरूवातीला भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समझोता न झाल्याने भरोसा सेलने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले. यानंतर पीडिताने गुरूवारी (29 मे) दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती व सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीचा विवाह योगेश राजु पवार (रा. बोल्हेगाव) याच्याशी 27 डिसेंबर 2020 रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले गेले, मात्र त्यानंतर पती योगेश पवार व सासू कविता राजु पवार यांनी पीडितेला मुल होत नसल्याच्या कारणावरून त्रास देण्यास सुरूवात केली. तिच्यावर दवाखान्याच्या उपचारासाठी माहेरून दिड लाख रूपये आणण्याचा दबाव टाकला. पैसे न आणल्यामुळे तिच्यावर वारंवार मारहाण, शिवीगाळ, उपाशी ठेवणे आणि मानसिक छळ केला गेला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
चिंचाळे (ता. राहुरी) येथे नांदत असलेल्या विवाहितेकडे घर बांधणीसाठी 10 लाखांची मागणी करण्यात आली. त्यासाठी त्यांचा छळ करण्यात आला. त्या सध्या कापुरवाडी (ता. अहिल्यानगर) येथे राहत असून त्यांनी छळाबाबत सुरूवातीला भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समझोता न झाल्याने गुरूवारी (29 मे) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पती नंदकुमार उत्तम तोरणे, सासू सुमन उत्तम तोरणे आणि नणंद मनिषा सुरेश कसबे (सर्व रा. मारूती मंदिराचे जवळ, चिंचाळे, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता ‘या’ तारखेला...

0
नाशिक | Nashik नाशिक तहसील कार्यालयाच्या ( Nashik Tehsil Office) हद्दीत वाहतूक पथकाने अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करताना जप्त केलेल्या गौण खनिजाचा जाहीर लिलाव...