Friday, October 23, 2026
Homeक्राईमCrime News : महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणारे दोघे पकडले

Crime News : महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणारे दोघे पकडले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील सिध्दार्थनगर परिसरात एका महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. 11 जून रोजी मध्यरात्री पीडितेच्या घरासमोर काहीतरी पडल्याचा आवाज आला. महिलेने दरवाजा उघडून पाहिले असता दारात कागदी बॉक्स दिसला. महिलेने कुटुंबीयांच्या मदतीने तो बॉक्स उघडून पाहिला असता त्यामध्ये असलेल्या वस्तूमुळे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली व त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तपासाची सूत्रे हाती घेत संशयित आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मुख्य संशयित विनोद मधुकर त्रिभुवन (वय 43, रा. सिध्दार्थनगर, म्युनिसिपल कॉलनी) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा प्रकार आपला साथीदार हर्ष सुनील शेलार (वय 18) व एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुख्य आरोपीसह हर्ष शेलार यास ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ ऑक्टोबर २०२६ – सामाजिक संघर्षाच्या मेळाव्यांची मांदियाळी

0
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दसरा मेळाव्यांना ऐतिहासिक महत्त्व असले, तरी यंदाचे मेळावे पारंपरिक शक्तिप्रदर्शनापेक्षा स्फोटक राजकीय व सामाजिक संघर्षाचे केंद्र ठरले. शिवसेना शिंदे आणि ठाकरे...