Monday, June 17, 2024
Homeक्राईमजागरण कार्यक्रमास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

जागरण कार्यक्रमास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या 15 व 16 वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले आहेे. ही घटना दि. 17 मे रोजी घडली असून या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 35 वर्षीय महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिलेची एक 15 वर्षीय मुलगी आहे. तर त्यांच्या नणंदेची एक 16 वर्षीय मुलगी आहे.

दि. 17 मे 2 रोजी रात्री आठ वाजे दरम्यान सदर दोन्ही कुटुंब ताहराबाद परिसरात असलेल्या एका जागरणाच्या कार्यक्रमात गेले होते. त्या ठिकाणाहून 15 व 16 वर्षीय सदर दोन्ही अल्पवयीन मुलींचे कोणीतरी अपहरण करून त्यांना पळवून नेले. नातेवाईकांनी सदर दोन्ही मुलींचा परिसरात शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. दोन्ही मुलींपैकी एका मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या