मुंबई | Mumbai
मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर काल शुक्रवारी शिवाजी पार्क परिसरात (Shivaji Park Area) मॉर्निग वॉकसाठी गेले असता पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर आता याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना (Accused) ताब्यात घेतले असून इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे…Accident : वाढदिवच्या सिलिब्रेशनला गेले ते परतलेच नाही; भीषण अपघातात ६ मित्रांचा जागीच मृत्यू
Accident : वाढदिवच्या सिलिब्रेशनला गेले ते परतलेच नाही; भीषण अपघातात ६ मित्रांचा जागीच मृत्यू
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे जण भांडुप (Bhandup) पश्चिम भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून हा हल्ला राजकीय वादातून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एकाच नाव अशोक खारत व दुसऱ्याच नाव सोलंकी असल्याचे समजते. तर दोन्ही आरोपींची पोलीस (Police) कसून चौकशी करत आहेत.
कसब्याच्या निकालावर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये…”
दरम्यान, दुसरीकडे संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून हल्ला करून आरोपी पळून जात असल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. तसेच देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या असून मनसे नेत्यांनी हल्ल्याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊतांच्या (Sanjay Raut) चौकशीची मागणी केली आहे. तर नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्याकडे बोट दाखवले होते.