Saturday, May 4, 2024
Homeनगरसमृद्धी महामार्गावरून रात्रीचा ठरतोय प्रवास धोकादायक!

समृद्धी महामार्गावरून रात्रीचा ठरतोय प्रवास धोकादायक!

वैजापूर | प्रतिनिधी

नागपूर ते मुंबई असा लांबचा पल्ला अवघ्या आठ तासांत गाठून देण्यासाठी राज्य सरकारने समृद्धी महामार्ग बांधला. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा प्रवासही सुरू झाला. मात्र, भीषण अपघातांनी गाजलेल्या या महामार्गावर आता दगडफेकीचेही प्रकार घडत आहेत.

- Advertisement -

नागपूर ते शिर्डी या मार्गावर अनेक महत्त्वाची शहरं लागतात. पण शहरांच्या बाहेरून जाणाऱ्या या रस्त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. इथे पोलीस स्टेशन नाही आणि पेट्रोल पंपही नाहीत. दुकानेही नाहीत. त्यामुळे वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाशिवाय दुसरे काहीच नाही. तसेच गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) दगडफेकीच्या घटना सतत घडताना पाहायला मिळत आहे.

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

दरम्यान आता पुन्हा अशीच काही घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर वैजापूरच्या सुराळा शिवारात पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, ज्यात एक मुलगा गंभीर झाला आहे.

राजस्थान येथील भाविक हे शिर्डी येथून दर्शन घेऊन समृद्धी महामार्गावरून जीपने छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, वैजापूरच्या सुराळा शिवारात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला असून, यात दोन जण जखमी झाले आहे. ज्यात एक मुलगा गंभीर झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन चिमुकल्यासह ५ जणांचा मृत्यू

दरम्यान या महामार्गावर सतत होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत असतानाच आता लुटमार आणि दगडफेकीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्रीचा प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे. महामार्गावर बचाव पथक आणि महामार्ग पोलिसांच्या नंबरचे फलक लावण्यात आले असून अडचणीत वाहनधारक यांची मदत घेऊ शकतात. तसेच ११२ क्रमांक डायल करून सुद्धा तुम्ही मदत मागू शकता.

वैजापूर-गंगापूर रस्त्यावर मृत्यू झालेल्या ‘त्या’ इसमाचा खुन

- Advertisment -

ताज्या बातम्या