धुळे । dhule । प्रतिनिधी
शिरपूर शहरातील क्रांती नगरात शनिवारी भरदिवसा तरूणाचा( youth) धारदार हत्यारांनी वार करीत निर्घुण खून (murder) करण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरा 7 सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक (arrested) केली आहे. एक संशयीत आरोपी जखमी असून तो धुळ्यात उपचार घेत आहे.
दरम्यान गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यासह त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी तरूणाच्या नातेवाईकांसह भोई समाजाने रविवारी सकाळी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर काहींनी शिंगावेतील मुख्य संशयीत गणेश उर्फ भट्टया जगताप यांच्या घरावर हल्ला चढवित साहित्याची तोडफोड केली.
दोन वर्षापुर्वी मयत राहुल राजू भोई (वय 22 रा. बालाजी नगर, शिंगावे शिवार, शिरपूर) याने परिसरातील गणेश उर्फ भट्या सुभाष जगताप यास दुचाकीने कट मारला होता. असे गणेश हा सांगत असल्याने त्यास समजविण्यासाठी मयताचे वडील राजु गुलाब भोई हे गेले होते. तेव्हा त्याना गणेशसह त्याचा भाऊ गोलु यांनी मारहाण केली.
तेव्हापासून गणेश हा खुन्नस ठेवत होता. त्या भांडणाची कुरापत काढून गणेश जगताप यांच्यासह दादा पाटील, बंटी पाटील, विक्की दत्तु पाटील, मोहा उर्फ मोहित धाकड, दीपक धोबी, कोहिनुर राजपुत व त्यांच्यासोबत इतरांनी तलवार, चाकु आणि गुप्ती घेवून शनिवारी सायंकाळी राहुल भोई यास रस्त्यात गाठले.
चाकुन पोटाजवळ वार करीत त्याचा खून केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर काल शहरा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य संशयीत गणेश जगताप हा जखमी असून त्यांच्यावर धुळ्यात उपचार सुरू असून पोलिस लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आज शिरपूर पोलिसात बंटी पाटील आणि कोहिनुर राजपुत यांना अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय जी.बी.कुटे हे करीत आहेत.