नाशिक । Nashik
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांवर हल्ला करण्यात आला असून यामध्ये दोन पोलीस जखमी झाले आहेत.
येथील शिवजयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर काही समाजकंटकांनी काल (दि.१९) रोजी येथील त्रिमूर्ती चौक परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याने यामध्ये दोन पोलीस गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराज शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने देवळाली पोलिस हदीत कर्तव्य करीत असताना संसरी येथील एका इसमा बरोबर भांडण झाले. यानंतर इसम तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येत फिर्यादी पोलीस नाईक आहेर यांच्यावर दगड फेक केली. यात पोलीस नाईक आहेर यांसह पोलीस शिपाई मनोहर साळुंखे हे दोघे गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुनील उपचारानंतर रुग्णालयात दाखल जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या पूर्वी या समाजकंटकांना पांगविण्यासाठी पोलिसांना पुन्हा एकदा बळाचा वापर करत गर्दी पांगवावी लागली.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त विजय खरात विजय खरात व सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र देशमुख व सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते प्रकाश गीते यांनी शहरात बंदोबस्त ठेवला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयिताना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित नऊ जणांचा पोलीस शोध घेत आहे.