Saturday, May 4, 2024
Homeनाशिकउपनगरला दोन घरफोड्या; 'इतक्या' लाखांचा ऐवज लंपास

उपनगरला दोन घरफोड्या; ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

उपनगर पोलीस स्टेशनच्या (Upnagar Police Station) हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी (Robbery) झाली असून या घटनेत अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे सव्वा सहा लाख रुपयाचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

जेलरोड परिसरातील सिद्धेश्वरनगर येथे राहणाऱ्या वैशाली संदीप जोंधळे ह्या काही कामानिमित्त आपल्या बहिणीच्या घरी गेल्या असता या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील रोख रकमेसह सुमारे पाच लाख 52 हजार रुपये दागिने चोरून नेले. त्यामध्ये 75 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, 72 हजार रुपयाची सोन्याची चैन, 52 हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, 96 हजार रुपये 32 ग्रॅम वजनाचे सोन्याची पोत, 39 हजार रुपये किमतीची सोन्याची लहान पोत, 37 हजार रुपयाची सोन्याची अंगठी, 18 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी,

13 हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 6 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंगा, तीन हजार रुपयाची सोन्याची नथ, अठरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील वेल, दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल, 50 हजार रुपये असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

या घटनेप्रकरणी वैशाली जोंधळे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे हे करत आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत नाशिक पुणे मार्गावरील ममता आनंद संकुल येथे असलेले राज ज्वेलर्स नावाचे दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील 70 हजार रुपये किमतीचे चांदीचे भांडे व मुर्त्या चोरून नेल्या.

ही घटना दुकानाचे मालक राजू दत्तू देवकर यांना समजताच त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चौधरी हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या