Saturday, September 19, 2026
HomeनगरShrigonda : दोन चिमुकल्या बहिणींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Shrigonda : दोन चिमुकल्या बहिणींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ (Loni Vyanknath) येथील मडकेवाडी परिसारात आनंदी अनिल कांडेकर व वीरा प्रवीण कांडेकर या दोन सख्या चुलत बहिणींचा (Cousins Sister) शेत तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Farm Pond Drowning Death) झाला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे, अनिल व प्रवीण कांडेकर हे दोघे भाऊ लोणी व्यंकनाथ शिवारात राहत असून त्यांच्या घराच्या पाठीमागे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी शेत तलाव बनवला आहे. गुरूवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आनंदी अनिल कांडेकर (वय 3) व वीरा प्रवीण कांडेकर (वय 3) या दोघी चिमुरड्या सख्या चुलत बहिणी घरच्यांची नजर चुकून शेततळे असलेल्या ठिकाणी खेळण्यासाठी गेल्या आणि घसरून शेत तळ्यात पडल्या.

- Advertisement -

सदर घटना घरातील महिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला तर प्रसंगावधान राखून एका महिलेने शेजारील गणेश काकडे यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. गणेश काकडे व त्यांचे सहकार्‍यांनी तात्काळ दोन्ही मुलींना तलावातून बाहेर काढून गावातील डॉ. राहुल पवार यांच्याकडे आणले असता त्यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. मात्र, उशीर झाल्याने त्या दोघींचा मृत्यू (Death) झाल्याचे सांगण्यात आले.

लोणी व्यंकनाथ येथील काही गावकरी यांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मुळे यांना फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतू खाजगी पेशंटला देता येत नाही, असे सांगितल्याने त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैला डांगे यांना फोन केला. परंतु त्यांनी नकार दिल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत गावात असलेले प्राथमिक केंद्र कुलूप ठोकून बंद केले.

ताज्या बातम्या

सख्खा भाऊ पक्का वैरी! दारूच्या व्यसनातून लहान भावानेच केला मोठ्या भावाचा...

0
उक्कलगाव (वार्ताहर ) दारूच्या व्यसनाला कंटाळून आणि लग्नात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून लहान भावानेच 'आपल्या मोठ्या भावाचा' खून केल्याची खळबळजनक घटना असून श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव...