Monday, May 19, 2025
Homeधुळेवणीत सर्प दंशाने दोघा बहिणींचा मृत्यू

वणीत सर्प दंशाने दोघा बहिणींचा मृत्यू

दोंडाईचा- Dondaich (श. प्र.)

- Advertisement -

येथून जवळच असलेल्या वणी (ता. शिंदखेडा) (Vani (St. Shindkheda) येथे आज पहाटे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सर्पदंशाने (snakebite) दोन सख्या बहिणींचा (two sisters) मृत्यू (death) झाला. घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

वणी येथे गणेश दीपचंद भिल हे राहतात. ते नेहमीप्रमाणे कुटुंबीयांसह घरात झोपलेले होते. आज पहाटेच्या त्यांची मुलगी निकिता गणेश ठाकरे (वय ११) व सविता गणेश ठाकरे (वय १० वर्ष) या दोघा बहिणींना मण्यार जातीच्या सर्पाने दंश केला. ही बाब लक्षात येताच दोघींना पहाटे चार ते पाच वाजे दरम्यान दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी प्राथमिक उपचार करून दोघी मुलीची परस्थिती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना दोघींचा मृत्यू झाला. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान दोंडाईचा येथील आरडीएमपी हायस्कूलमध्ये निकिता ही सातवीत तर सविता पाचवित शिकत होती. दोघा बहिणींवर वणी गावात संध्याकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश भिल यांना पाच मुलींपैकी निकिता ही चौथ्या क्रमांकाची व सविता पाचव्या क्रमांकाची मुलगी होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ मे २०२५ – फार नाही मागणे

0
नुकताच जागतिक कुटुंब दिवस जगाने साजरा केला. अनेक पाश्चात्य देशांमध्ये कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाल्याचे नेहमीच बोलले जाते. बहुसंख्य देशांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचा अतिरेक आढळतो. तेथील समाज...