Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकदहावीच्या परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; गॅस टँकरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

दहावीच्या परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; गॅस टँकरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

येथील सिन्नर-घोटी महामार्गावर (Sinnar-Ghoti Highway) असलेल्या आगासखिंड शिवारात गॅस टँकरने धडक दिल्याने दहावीच्या परिक्षेला जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना आज (दि.२) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दर्शन शांताराम आरोटे (१४) व शुभम रामनाथ बरकले (१४) रा. दोघेही आगासखिंड असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. दहावीच्या परिक्षेला (Ssc Exam) आजपासून सुरुवात झाली असून आज (दि.२) मराठीचा पहिला पेपर होता. दर्शन व शुभम हे आगसखिंड येथील माध्यमिक विद्यालयात शिकत असून परिक्षेसाठी सकाळी ९ च्या सुमारास आपल्या स्कुटी क्र. एम. एच. १५ जी. एन. २४०५ ने पांढुर्ली येथील परिक्षा केंद्राकडे जाण्यासाठी निघाले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

… हे तर भाजपचं धोरण; उद्धव ठाकरेंचा टोला

त्यानंतर दर्शन व शुभमने आगासखिंड (Agaskhind) गावाजवळ महामार्गालगत असणाऱ्या डी. एड. महाविद्यालयाच्या गेटवर असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर दर्शन घेऊन ते स्कुटीवरुन निघाले असता समोरुन येणाऱ्या एच. पी. गॅसच्या टँकरने (Gas Tanker) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : पुन्हा तारीख पे तारीख; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

या धडकेनंतर दोघेही दुरवर फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.

कसबा पोटनिवडणूक जिंकताच मविआकडून नाशकात आनंदोत्सव

दरम्यान, या घटनेनंतर सिन्नर पोलिसांनी (Sinner Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत टँकर व चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दर्शन व शुभमच्या मृत्यूने आगसखिंडसह पांढुर्ली परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या