Wednesday, June 26, 2024
Homeक्राईमगुरांची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले ; पंधरा लाखाचा ऐवज जप्त

गुरांची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले ; पंधरा लाखाचा ऐवज जप्त

वरणगाव – वार्ताहर Bhusawal
वरणगाव (ता.भुसावळ) पोलिसांनी गुरांची अवैध पणे वाहतूक करतांना दोन ट्रक पकडले असून या कारवाईमध्ये ३८ म्हशीसह दोन ट्रक जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली होती.

- Advertisement -

गुरांचे अवैध वाहतूक हतनूर कडे सुरू आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस ईश्वर तायडे, योगेश पाटील यांना त्या ठिकाणी पाठवले असता १६ जून रोजी सकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास दोन अशोक लेलँड कंपनीच्या ट्रक हतनूर कडून बोहर्डीकडे जात होते. त्यावेळी पोलीसांनी त्यांना थांबवले असता या ट्रकमध्ये एकूण ३८ म्हशी कोंबुन भरलेल्या होत्या. त्या म्हशींना दोरीने घट्ट बांधलेल्या होते, त्यांना व्यवस्थित उभे राहायला सुद्धा जागा नव्हती, तसेच चारा पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती.

कोणताही परवाना नसताना ही वाहतूक सुरू होती, पोलिसांनी त्यांचे नाव विचारले असता लखन सखाराम शिंदे, वय ३५ राहणार सेंदवा व राजुखा सलीम खा, राहणार, निमराणी ता खरगोन अशी त्यांची नावे होती. त्या प्रकरणी पोलिसांनी गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना बोलवून दोन्ही ट्रकचा पंचा समोर पंचनामा केला आहे. या कारवाईत सात लाख साठ हजार किमतीच्या म्हशी व आठ लाख रुपये किमतीच्या दोन ट्रक एकूण पंधरा लाख साठ हजार रुपये किमतीच्या ऐवज जप्त करण्यात आला असून सदर म्हशींना सुरक्षिततेच्या दृष्टीने श्रृंगऋषी सेवाश्रम बलवाडी तालुका रावेर येथे जमा करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या