Thursday, July 23, 2026
HomeनगरAccident News : दोन वाहनाच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

Accident News : दोन वाहनाच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर- दौंड रस्त्यावरील काळेवाडी, हिवरेझरे (ता. अहिल्यानगर) परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात 6 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोन अज्ञात चारचाकी वाहनचालकांविरूध्द अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी (8 ऑक्टोबर) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

घटनेची हकिगत अशी की, 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास माऊली किराणा दुकानासमोर, काळेवाडी, हिवरेझरे येथे दोन अज्ञात चारचाकी वाहनांनी भरधाव वेगात येत रस्त्यावर चाललेल्या रूचीना नशीब काळे (वय 6, रा. काळेवाडी हिवरेझरे, ता. जि. अहिल्यानगर) हिला जोराची धडक दिली. पहिल्या वाहनाच्या धडकेनंतर दुसर्‍या चारचाकीने तिच्या दोन्ही पायांवरून जात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले; परंतु तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान अपघातानंतर दोन्ही वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले. याबाबत मृत बालिकेची आई पल्लवी नशीब काळे (वय 35, रा. काळेवाडी, हिवरेझरे) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस अंमलदार खेडकर करीत आहेत.

ताज्या बातम्या

सहकार व शिक्षण महर्षी चांगदेवराव होळकर यांचे निधन

0
लासलगाव । प्रतिनिधी Lasalgaon सहकार व शिक्षण महर्षी चांगदेवराव भागवतराव होळकर( वय ९५ )यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले असा...