Wednesday, January 7, 2026
HomeनगरAccident News : दोन वाहनांचा भीषण अपघात; चौदाजण जखमी

Accident News : दोन वाहनांचा भीषण अपघात; चौदाजण जखमी

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

भारतीय सैन्यात भरती होणार्‍या नातवाला न सांगता अचानक भेटून आश्चर्यचकित करण्याच्या उद्देशाने कर्नाटकहून (Karnataka) नाशिककडे निघालेल्या कुटुंबियांना तसेच दुसऱ्या वाहनात मध्य प्रदेशहून (Madhya Pradesh) अहिल्यानगरला लग्नाला निघालेल्या पाहुण्यांना कोल्हार (Kolhar) येथील पुलावर गुरुवारी (दि. 5) पहाटे अपघाताला (Accident) सामोरे जावे लागले. दोन भरधाव वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 14 जण जखमी (Injured) झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की, नाशिक (Nashik) येथे वास्तव्यास असलेला नातू सैन्य भरतीसाठी (Military Conscription) आवश्यक असलेल्या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाला. गुरुवारी त्याची अंतिम परीक्षा होती. नातवाला न सांगता अचानकपणे त्याला भेटून आश्चर्यचकित करण्यासाठी लखामपूरहून (कर्नाटक) निघालेल्या आजोबांसह सर्व कुटुंबियांचा कोल्हारच्या पुलावर (Kolhar Bridge) अपघात झाला. त्यांच्या वाहनाची (क्रमांक केए.49, एम.2556) समोरून येणार्‍या कारला (क्रमांक एमपी.07, झेडएक्स.4230) समोरासमोर जबर धडक (Hit) झाली. धडक इतकी प्रचंड होती की, कर्नाटकहून येणारे वाहन रस्त्यावर अक्षरशः उलटले होते. तर कारमधील प्रवासी हे गुनाहून (मध्य प्रदेश) अहिल्यानगरला (Ahilyanagar) नातेवाईकाच्या लग्नासाठी चालले होते.

YouTube video player

या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महिला आणि छोट्या बालकांचा समावेश आहे. त्यांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. आजूबाजूच्या रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन 11 जखमींना उपचारासाठी तत्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 3 जखमींना उपचारार्थ अहिल्यानगरला हलवले. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उलटलेले वाहन दोराच्या साह्याने लोटून पूर्ववत केले. रस्त्याच्या मधोमध असलेली दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला केली. त्यामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली. अपघातामुळे (Accident) बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अत्यंत धीम्या गतीने दुतर्फा वाहतूक सुरू होती. घटनेच्या 5 तासानंतर सकाळी 11 वाजता वाहतूक पूर्णतः सुरळीत झाली.

या अपघातात प्रकाश बलअप्पा दलवाई, नागमीना मारुती हुलीकुई, शिदलीनअप्पा दलवाई, पूर्वा शिवानंद फुलवाई, अशोक देसाई फुलवाई, आकाश फकीरअप्पा कचेशयामी, सुनंदा मदरअप्पा अवली, प्रभूचरणअप्पा धमर, मालवा दलवाई, हनेमखा रामअप्पा कुलगोई, शिवानंद कुलगिरे (सर्व रा. लखामपूर, जि. बागलकोट, कर्नाटक) आणि संजय घनश्यामसिंग राठोड, मीरा संजय राठोड, स्नेहा बिरू राठोड (सर्व रा. गुना, मध्य प्रदेश) हे जखमी झाले आहेत. यामध्ये दोन्ही वाहनांच्या अग्रभागाचा चक्काचूर झाला असून अपघातग्रस्त वाहने राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) नेण्यात आली.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...