धुळे – मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग घाटात ओव्हेरटेक करण्याच्या नादात भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी मोहाडी पोलिसात कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
प्रताप हिरामण मस्के (वय 45 रा. अनकवाडी ता. धुळे) असे मयताचे नाव आहे. ते दि. 30 जुन रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच बीके 3089) जात होते. त्यादरम्यान लळींग घाटात बीएसएनएल टॉवरच्या समोर भरधाव कंटेनरने (क्र.आरजे 07 जीडी 3189) पुढे चालणार्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली.
त्यात प्रताप मस्के यांच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला. याप्रकरणी संग्राम पितांबर चव्हाण (रा. अनकवाडी) यांनी मोहाडी पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.