Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारपुलावरून पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुलावरून पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

धडगांव शहरापासून (Dhadgaon city) अवघ्या 1 कि.मी. अंतरावर असलेल्या उमराणी खुर्द व वळफळ्या दरम्यान नाल्याच्या फरशी पुलावरुन (bridge over the nala floor) दुचाकीस्वार पडुन मृत्यू (Bike rider dies) झाल्याची घटना घडली आहे .

- Advertisement -

याबाबत अधिक माहीती नुसार, धडगांवच्या दिशेने निघालेली दुचाकी (क्र.एम.एच.39. बी.2597) उमराणी व वळफळ्याच्या दरम्यान असलेल्या पुलावर अडकली तर दुचाकीस्वार खाली कोसळल्याने त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहीती मिळताच परीसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली परंतु तो पर्यंत उशीर झाला होता. अपघात झाल्यानंतर दुचाकी पुलावरच अडकली मात्र दुचाकीस्वार साधारणतः 15 ते 20 फूट उंचीच्या पुलावरून खाली फेकला गेला.

त्यामुळे डोक्याला मार लागुन मृत्यु झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेची माहीती स्थानिक नागरीकांकडुन पोलीस ठाणे ,धडगांव यांना कळविण्यात आले, माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करुन शव ग्रामीण रुग्णालय, धडगांव येथे पाठवण्यात आले. मृत व्यक्तीची ओळख पटली असुन उतर्‍या आरश्या वळवी (वय.46) रा. सूर्यपूर असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान धडगांव- गेंदा रस्ता अत्यंत खराब झाला असुन रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघाताच्या घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.सदर रस्त्याची दुरुस्ती करावी व फरशी पुलाला संरक्षण कठडे बसविण्याची मागणी स्थानिक नागरीक करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या