Wednesday, May 29, 2024
Homeनगरदोन महिलांना मारहाण करत विनयभंग

दोन महिलांना मारहाण करत विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दारू पिऊन दोन महिलांना शिवीगाळ, मारहाण करत त्यांचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि. 24) रात्री बोल्हेगाव उपनगरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी (दि. 25) आबा दामोदर थोरात (रा. जय भवानी चौक, बोल्हेगाव) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास थोरात हा फिर्यादी महिलेच्या घरासमोर आला व शिवीगाळ करू लागला. तुम्ही येथे रोज गाड्या लावतात, तुमची गाडी मी पेटवून देतो, असे म्हणाला असता फिर्यादी त्याला समजून सांगण्यासाठी गेल्या असता त्यांच्या सोबत थोरात याने गैरवर्तन केले. जवळ पडलेली विट फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. दरम्यान, भांडण सुरू असल्याचे पाहून फिर्यादीची भावजाई मध्ये आली असता थोरात याने त्यांच्या सोबत देखील गैरवर्तन केले. फिर्यादी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या असता थोरात याने घरावर दगडफेक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या