धुळे dhule/ कुरखळी । प्रतिनिधी/ वार्ताहर
शिरपूर शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने सापळा लावून तलवारी (swords) घेवून जाणार्या दुचाकीस्वार दोघा तरूणांना (Two youths) जेरबंद (arrested) केले. त्यांच्याकडून 11 तलवारी, 2 मोबाईल व दुचाकी असा एकुण 1 लाख 3 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांनी तलवारी कोणाकडून आणि कशासाठी घेतल्या याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
शिरपूर फाटा येथे दोन जण दुचाकीने (क्र.एम.एच.18/ए.यु.9502) येत असुन त्यांच्याकडे तलवारी असल्याची गुप्त बातमी शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना काल दि. 13 रोजी रात्री साडेनऊ वाजेचे सुमारास मिळाली. त्यांनी डी.बी.पथकाला कारवाईचे आदेश केले. त्यानुसार पथकाने शिरपूर फाट्यावर सापळा लावुन संशयीत दुचाकीस्वारांना पकडले. दोघांनी त्यांची नावे रोहित राजेंद्र गिरासे (वय 24) व मनीष ओंकार गिरासे (वय 19 रा. अहिल्यापूर ता. शिरपूर) अशी सांगितली.
त्यांच्या दुचाकीच्या उजव्या बाजुस सीट लगत प्लास्टीक कागदात एक तलवार दोरीने बांधलेली मिळुन आली. त्यामुळे त्यांच्याकडे आणखी किती तलवारी असुन त्या कोठे ठेवल्या याबाबत त्यांना विचारपूस केली असता रोहित गिरासे याने तो काम करीत असलेल्या गॅरेजमध्ये आणखी तलवारी ठेवल्याचे सांगितले.
त्याने आमोदे (ता.शिरपूर) शिवारातील शिरपूर फाट्यावरील बालाजी ऑटो पार्टर्स नावाने असलेल्या मोटार गॅरेजचे निकामी स्पेअर स्पार्ट्सचे आडोशास पांढरे रंगाची प्लास्टीक गोणीत ठेवलेल्या एकुण 10 तलवारी काढुन दिल्या. एकुण 11 तलवारी, 2 मोबाईल व दुचाकी असा एकुण 1 लाख 3 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द पोकॉ सचिन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे उल्लंघन 135 सह शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर, पोसई गणेश कुटे, संदिप मुरकुटे, डी. बी.पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, लादुराम चौधरी, पोना मनोज पाटील, पोकॉ विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रविण गोसावी, स्वप्निल बांगर, अमित रनमळे, भटु साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी व राम भिल यांच्या पथकाने केली.