पाचोरा – प्रतिनिधी Pachora
तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील शेत शिवारात असलेल्या शेत तळ्यात दोन तरूण पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेत पुनगाव येथील रवींद्र संभाजी कोळी वय अदांजे १८ वर्ष आणि पद्मसिंग भगवान पाटील वय २१ राहणार अंतुर्ली बुद्रुक ता.पाचोरा या दोन्ही तरुण मुलांचा शेतातील शेततळ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
- Advertisement -
घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दोघींना पाण्यातून बाहेर काढून पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून मृत घोषित केले. पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक प्रकाश चव्हाणके हे करीत आहेत.