Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरी परिसरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

दिंडोरी परिसरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी परिसरात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघे तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पहिला अपघात लखमापूर – भनवड रस्त्यावर झाला. या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावर खेडले येथील लक्ष्मण सुरेश चारोस्कर (23) हा मोटारसायकलने प्रवास करत होता. त्यावेळी खेडले फाटा मोरीवर मोटारसायकल आदळली. लक्ष्मण चारोस्कर हा खाली पडल्याने त्याच्या डोक्याला व नाकाला मार लागला. त्याला तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले. वलखेडचे सरपंच विनायक शिंदे यांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले.

दुसरा अपघात इंदोरे – रासेगाव रस्त्यावर झाला. इंदोरे रस्त्यावरुन काही अंतरावर दोन मोटारसायकलमध्ये धडक झाली. त्यात मनोली ता. नाशिक येथील विजय विष्णू दगडे (44) यांचा समोरच्या मोटारसायकालची धडक बसल्याने छातीला मार लागला व जागीच मृत्यू झाला. विजय दगडे यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व मुलगी, भाऊ, आई -वडील असा परिवार आहेत. पहिल्या अपघातील लक्ष्मण चारोस्कर हा अविवाहित होता. दोघांचेही दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास दिंडोरी, वणी पोलिस करीत आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...