सावदा । प्रतिनिधी
येथील शेखपुरा जवळच असलेल्या कुंभारवाडा येथील रहिवाशी 4 जण दोन मोटारसायकली वरून दि.26 रोजी पहाटे 5.30 वाजता शिरसाळा येथील मारोतीच्या दर्शनास निघाले होते.
- Advertisement -
दर्शनास जात असताना यातील दोन जण मोटार सायकल क्रमांक. एम एस 19 डी एम् 3789 वरूनजात असताना बोहला-बोहली फाट्या जवळच अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या अपघातात भास्कर पांडुरंग कुंभार (वय 18) हा गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. तर लखन पंकज कुंभार (वय 18) यास प्रथम उपचारार्थ वरणगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारार्थ भुसावळ येथील रिधम या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान सकाळी अकरा वाजता मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहरावर शोककळा पसरली. भुसावळ येथे रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकाचा आक्रोश होत होता.