Saturday, May 4, 2024
Homeनगरपिकअप, ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात दोन तरुण जागीच ठार

पिकअप, ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात दोन तरुण जागीच ठार

संगमनेर (प्रतिनिधी )

कोल्हार- घोटी राज्य मार्गावर मांची फाटा येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याचा सुमारास पिकअप, ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात तालुक्यातील वडगाव पान येथील दोन तरुण जागीच ठार झाले. या अपघातामुळे वडगावपान गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

शुक्रवारी दुपारी दोन वाजन्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मांची फाटा येथे भीषण अपघात झाला. लोणी कडून संगमनेरच्या दिशेने जाणारी पिकअप गाडी व मांची फाट्याकडे वळण घेत असलेला ट्रॅक्टर या दरम्यान लोणीहुन संगमनेर कडे जाणारी दुचाकीस यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वडगावपान येथील एकमेकांचे चुलत भाऊ असलेले आकाश विलास कुळधरण (वय23) आणि ऋषिकेश विजय कुळधरण (वय20 ) हे दोन तरुण जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळाल्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघात झाल्यानंतर पिकअप चालक पोलिसांना अपघाताची माहिती न देता फरार होण्यात यशस्वी झाला. त्यामुळे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी मांची फाट्यावरील हॉटेल पुरोहित आणि हॉटेल तरंग येथे जात तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून फरार झालेल्या पिकअपचा आणि तिच्या चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत. दरम्यान अपघातात ठार झालेले आकाश आणि ऋषिकेश हे दोन सख्खे चुलत भाऊ असल्याचे समजते. त्यांच्या अपघाती मृत्यूने वडगावपान आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या