Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारमासेमारीसाठी गेलेले दोन तरुण नाल्यात वाहून गेले

मासेमारीसाठी गेलेले दोन तरुण नाल्यात वाहून गेले

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

तालुक्यातील जांभीपाडा (Jambhipada) येथे मासेमारी करीत असतांना नाल्याला अचानक पूर (flood) आल्याने दोघे तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जांभीपाडा (Jambhipada) येथील गुरुदीप दिलीप पाडवी (वय २८) वर गणेश मोतू पाडवी (वय ४०) हे काल दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गावाजवळ असलेल्या नाल्याच्या फर्शी पुलावर मासे पकडण्यासाठी गेले होते.

सदर नाल्यात मासे पकडत असतांना अचानक नाल्याला पूर (flood) आल्याने ते दोघे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहुन गेले. तेव्हा आकाश दिलीप पाडवी हे त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, तेही पाण्यत वाहू लागले.

परंतु त्यांना इतर लोकांनी काठीच्या साह्याने बाहेर काढून वाचविले. मात्र, गुरुदिप पाडवी व गणेश पाडवी हे पाण्यात वाहून गेले. त्यांचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाहीत. याबाबत आकाश दिलीप पाडवी यांच्या खबरीवरून उपनगर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली आहे.

मिसिंग व्यक्तींमिळून आल्यास उपनगर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास असई केशव मिठ्या गावीत करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या