राहाता |वार्ताहर| Rahata
शहरातील डांगे हायस्कूलसमोर असलेल्या साई व्ही. के. टायर्स या दुकानात बुधवारी रात्रीच्या सुमारास अपोलो कंपनीचे सुमारे 4 लाख 90 हजार रुपयांचे टायर चोरी झाल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
नगर- मनमाड रोड लगत असलेल्या दुकानात चोरीच्या घटनेमुळे पोलिसांनी चोरट्यांनी आव्हान दिले आहे. आतापर्यंत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याचा तपास अजूनपर्यंत लागलेला नाही. त्यातच नगर -मनमाड रोडलगत असलेल्या टायरच्या दुकानात चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सदर टायरचे दुकान हे पार्टनरशिपमध्ये असून दिनांक 25 रोजी मॅनेजर सचिन जगताप हे दुकान बंद करून गेले. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी मॅनेजर जगताप आले दुकान उघडून आत गेले तर त्यांना दुकानाचे मागील बाजूचे पत्र्याचे शेड उचकटल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुकान मालक गणेश खेडके व शंकर विखे यांना सादर चोरीची कल्पना यांनी दिली. दुकानातील अपोलो कंपनीचे धृप मॉडेलचे 21 टायर्स किंमत दोन लाख पंचवीस हजार 918, एक्स गोल्ड प्लस मॉडेलचे सहा टायर्स किंमत 94388, दढ7 गोल्ड प्लस 6 टायर्स किंमत 45 हजार 977, इंडोमॅक्स श्रीं मॉडेलचे टायर्स किंमत 18 हजार 556, अल नेक 4सी चे 4 टायर्स किंमत 9 हजार 866, मेझर मॉडेलचे चार टायर्स किंमत 12 हजार 377, अलनेक 4सी मॉडेल 4 टायर्स किंमत 18 हजार 490, मेझर मॉडेलचे 5 टायर्स किंमत 16 हजार 725, एक्टिक ग्रीप मॉडेलचे आठ टायर्स किंमत 8 हजार 536, एकटी जीप व एकटी मॉडेलचे टायर किंमत 5408, कृषिक गोल्ड मॉडेलचे डॉन टायर्स किंमत 6948 राम माने अपोलो कंपनीचे एकूण 4 लाख 90 हजार 667 रुपये किमतीचे टायर्स चोरी गेले आहेत.
अशोक खेडके व शंकर विखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध भा.दं.वि.कलम 461, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा तपास राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शना खाली ए. पी. आय. संतोष पगारे करत आहेत.
राहाता शहरात अनेकदा टायर दुकानात चोरी होऊन लाखो रुपये किमतीचे टायर चोरट्यांनी लंपास केलेे आहेत, परंतुुु अद्याप पोलिसांना चोरट्यांचा शोध घेता आला नाही. त्यामुळे टायर व्यवसायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.