Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUday Samant: "तर आमच्यातील कोणीही ती जबाबदारी स्वीकारणार नाही"…; शपथविधी आधी उदय...

Uday Samant: “तर आमच्यातील कोणीही ती जबाबदारी स्वीकारणार नाही”…; शपथविधी आधी उदय सामंतांचं मोठं विधान

शपथविधीला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना अद्याप एकनाथ शिंदे यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली नाही. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही, यावरुन प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबई | Mumbai
शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही? याबद्दल अजूनही स्पष्टत नाहीय. शपथविधी सोहळा आता काही तासांवर आलेला असताना एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही? याबद्दल स्पष्टता नाहीय. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील तासाभरात निर्णय घेतला जाईल असे सांगितले. उदय सामंत यांनी या पत्रकार परिषदेत महत्त्वाचे खुलासे केले आहे.

शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. या मागणीला ते सकारात्मक प्रतिसाद देतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र शिवसेनेतील इतर ५९ आमदारांपैकी कोणीही या पदासाठी इच्छुक नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेतील इतर नेत्यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत जी चर्चा सुरू आहे, ती थांबली पाहिजे,” अशी भूमिका शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे.

- Advertisement -

आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना ओळखतो. ते चांगली खाती मिळवण्यासाठी प्रेशर टॅक्टिस वापरत नाहीत. ते एक संवेदनशील व्यक्ती आहेत. चर्चेत काही गोष्टी मागे-पुढे होतात. पण जनमताचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, हा विश्वास आम्हाला आहे. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना ओळखतो. ते चांगली खाती मिळवण्यासाठी प्रेशर टॅक्टिस वापरत नाहीत. ते एक संवेदनशील व्यक्ती आहेत. चर्चेत काही गोष्टी मागे-पुढे होतात. पण जनमताचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, हा विश्वास आम्हाला आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

पुढे ते असे ही म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही आणि ती जबाबदारी आमच्यातील इतर कोणावर टाकण्याचा प्रयत्न केला तर आमच्यातील कोणीही ती जबाबदारी स्वीकारणार नाही. एकनाथ शिंदे यांनाच आम्ही नेते मानले आहे आणि आमचे राजकीय करिअर त्यांच्या हाती सोपवले आहे,” अशा शब्दांत उदय सामंत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.

या सरकारमध्ये आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेने आणलेल्या योजनांची कायमस्वरुपी करण्यासाठी ते देवेंद्रजींना सहकार्य करतील, एकत्र बसून महाराष्ट्रातील निर्णय होतील, ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाचंही नाव येऊ नये, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आमच्या कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की, या खुर्चीवर जाऊन बसावं. हा खुलासा करावे लागणे हे आमचे दुर्दैव आहे. आम्ही नेता एकनाथ शिंदे यांनाच मानतो. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही आमची इच्छा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...