Sunday, March 30, 2025
Homeराजकीयकरोनाचा विनाकारण बाऊ - उदयनराजे

करोनाचा विनाकारण बाऊ – उदयनराजे

सातारा – करोनाचा विनाकारण बाऊ केला जात आहे. सध्या देशावर आलेल्या करोना संकटाला न घाबरता सामोरे जा, स्वीडनमध्ये ज्याप्रकारे हर्ड इम्युनिटी पद्धीतीचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे भारतानेही वापर करावा. तसेच, करोनाच्या संकटात कुणीही राजकारण करु नये, असं भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. सातार्‍यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 3 ट्रिलियन्स व्हायरस आहेत. त्यामुळे अनेकांना करोना होऊनही गेला असेल, पण आपल्या रोगप्रतिकारशक्तीने त्यावर मात केली असले. त्यामुळे करोना हा वन ऑफ द व्हायरस आहे. त्यामुळे एवढा बाऊ करायचा विषय नाही. पण, प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे आणि या व्हायरसला घाबरुन न जाता वस्तुस्थितीला सामोरे गेले पाहिजे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...