सातारा | Satara
शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने साताऱ्यातील प्रतापगड किल्ल्यावर खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या क्रार्यक्रमासाठी राज्याचे मुख्ममंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री कार्यक्रमात उपस्थित होते.
परंतु, या कार्यक्रमात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे मात्र अनुपस्थित राहिले आहेत. उदयनराजे भोसलेंच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या देखील प्रतापगडावरील कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी किल्ले प्रतापगडावरील कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या कार्यक्रमांना उदयनराजेंनी उपस्थित राहावं यासाठी काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरु होते. परंतु उदयनराजेंकडून त्याला प्रतिसाद दिला नाही अशी माहिती आहे.