Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रउध्दव ठाकरेंचा मोदी-शहांना सल्ला; 'मोदी-शहांनी बांगलादेशात जावे'

उध्दव ठाकरेंचा मोदी-शहांना सल्ला; ‘मोदी-शहांनी बांगलादेशात जावे’

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा असून यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमधून त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मोदी-शहांनी बांगलादेशात जावे, हिंदुंवरील अत्याचार थांबवावेत, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

नेमके काय म्हणाले उध्दव ठाकरे?
उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहे, यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. बांगलादेशमध्ये उद्धभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जगभरात जनतेचा संयम सुटतोय जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, बांगलादेशमध्ये अराजक निर्माण झाले आहे, तुम्ही जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर हिंदुंनाही संरक्षण द्या. बांगलादेशातील हिंदूंच रक्षण करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. संयम सुटल्यावर काय होते हे बांगलादेशने दाखवले असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

उध्दव ठाकरे पुढे असे ही म्हणाले, की आज पाकिस्तान बांगलादेश श्रीलंकेमध्ये जी स्थिती झाली आहे यावरून एकच लक्षात येते की जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. इस्त्रायलमध्येही हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पंतप्रधानांना घरातून बाहेर पडणे अशक्य झाले होते, अशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये. बांगलादेशमध्ये आज जे काही घडले आहे तो इशारा आपल्या सर्वांसाठी असून जनतेचे न्यायालय सर्वोच्च असल्याचे ठाकरे म्हणाले. कोणीच स्वत:ला देवापेक्षा मोठे मानू नये, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला.

हिंदूंच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी
जगभरात अनेक देश अशांत आहेत. सर्वसामान्य जनता मजबूत असते. तिचा अंत कसा होतो, हे काल आपण पाहिले. जर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असेल, तर ते थांबले पाहिजेत. काल सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात ही माहिती दिली. केंद्र सरकारने ताबडतोब पावले उचलावी. तिथल्या हिंदूंच्या रक्षेची जबाबदारी सरकारची आहे’.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या