Wednesday, November 11, 2026
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या 'या' नेत्याने उडवली खळबळ

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली खळबळ

मुंबई | Mumbai

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

गुलाबराव पाटलांच्या सूचक विधानामुळे ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे. जिथे आमचे इंजिन (शिंदे) जाईल, तिथे डबा (आम्ही) जाईल, असे म्हणत पाटलांनी सुचक वक्तव्य केले आहे. यावरून राज्यात चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे. प्रताप सरनाईक-संजय राऊत भेटीनंतर ही राजकीय खळबळ अधिकच वाढली असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गुलाबराव पाटील यांनी दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली नाही. उलट जिकडे एकनाथ शिंदे जातील, तिकडे आम्ही जाणार, असं सूचक विधान करून गुलाबराव पाटील यांनीही या चर्चेला हवा दिली आहे. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता फेटाळली नाही. उलट सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का? असा सवाल गुलाबराव पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेटच भाष्य केलं. मी काही सांगू शकत नाही. शेवटी मी आगगाडीचा डब्बा आहे. आमचे एकनाथ शिंदे इंजिन आहेत आणि इंजिन जिथे असतं तिथे डब्बा असतो. त्यामुळे जिकडे आमचे इंजिन जाईल, तिकडे डब्बा जाईल, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

Leopard Death : दोन बिबट्यांमध्ये पाणी पिण्यावरून भीषण संघर्ष; एका बिबट्याचा...

0
खंडाळा | Khandala श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील खंडाळा गावाच्या बारा जांभळी परिसरात दोन बिबट्यांमध्ये (Leopard) पाणी पिण्यावरून झालेल्या संघर्षात एका बिबट्याचा मृत्यू (Leopard Death) झाल्याची...