मुंबई | Mumbai
गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी माणसांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र यावे, अशी इच्छा आहे. अशातच आता मुंबईत मराठी सेनेने (Mumbai Marathi Sena) गुढीपाडव्यानिमित्त (Gudhi Padwa) उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी एक मिलन कार्यक्रम आयोजित केला आहे.
मराठी सेनेचे मोहनिश राऊळ (Mohnish Raul) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे (दि.३० मार्च) रोजी “बंधू मिलन” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंना बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं, अशी विनंती निमंत्रण देऊन केली जाणार आहे. तत्पूर्वी ही निमंत्रण पत्रिका राऊळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ठेवली आहे.
दरम्यान, राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) पार पडल्या (Maharashtra Politics) आहेत. त्यानंतर आता सर्वत पक्ष महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशी भावना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह मराठी लोक व्यक्त करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.
निमंत्रण पत्रिकेत नेमकं काय म्हटलं आहे?
‘भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किरॅनारा आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार’. बंधू मिलन कार्यक्रम दिनांक ३० मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असे निमंत्रण पत्रिकेमध्ये म्हटले आहे.