Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्याखासदार राहुल शेवाळे यांचा १०० कोटींचा मानहानीचा दावा; उद्धव ठाकरे, संजय...

खासदार राहुल शेवाळे यांचा १०० कोटींचा मानहानीचा दावा; उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

शिंदे शिवसेना गटाचे खासदार राहूल शेवाळे यांच्याबाबत सामना वृत्तपत्रातून बदनामीकारक वृत्त प्रसिध्द केल्याने अडचणीत आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने झटका दिला आहे. खासदार राहूल शेवाळे यांनी दाखल केलेल्या १०० कोटी मानहानी दाव्यातून (Defamation) दोषमुक्त करण्याची विनंती ठाकरे आणि राऊत यांचा अर्ज दंडांधिकारी एस. बी. काळे यांनी फेटाळून लावला. न्यायालयाच्या (Court) या निर्णयामुळे ठाकरे आणि राऊत यांना खटल्याला समोरे जावे लागणार आहे…

सामना या मुख्यपत्रातून खासदार शेवाळे यांच्याविरोधात २९ डिसेंबर २०२२ रोजी आक्षेपार्ह वृत्त प्रसिध्द करण्यात आले. शेवाळे यांचा पाकिस्तानमध्ये रियल इस्टेटचा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचा सहभाग असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. याप्रकरणी शेवाळ यांनी माझगांव न्यायालयात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा काही संबंध नाही. पीआरबी कायद्यानुसार वृत्तांची निवड करणे आणि  प्रसिध्द झालेल्या वृत्ताची जबाबदारी ही सहसंपादक अतुल जोशी यांची असल्याने या खटल्यातून दोषमुक्त करावे अशी विनंती करणार अर्ज अ‍ॅड. मनोज पिगळे यांनी केला होता. त्या अर्जावर दंडाधिकारी एस. बी.काळे यांच्यासमोर सुनावणी झाली.न्यायालयाने ठाकरे आणि राऊत यांचा दावा अमान्य करत दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळून लावला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या