Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्याहे म्हणजे बॉम्बस्फोटवेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखं; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

हे म्हणजे बॉम्बस्फोटवेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखं; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

ड्रग्ज तस्करीचे आरोप असलेल्या ललित पाटीलला मिळालेल्या राजकीय आश्रयावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटीलला २०२० मध्ये अटक झाली तेव्हा तो शिवसेनेचा नाशिक शहराध्यक्ष होता, असा आरोप केला. तसेच ललित पाटील शिवसेनेचा पदाधिकारी होता म्हणूनच त्याला तेव्हा सवलत मिळाली का? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले, “सगळ्यांना सत्य माहीत आहे. त्यावर आमचे नेते अरविंद सावंत, संजय राऊत, सुषमा अंधारे बोलत आहेत. त्यांच्याकडे (फडणवीस) प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्यांच्या आरोपाला संजय राऊतांनी योग्य उत्तर दिलं आहे. जर त्या वेळेस ललित पाटील नाशिक शहर प्रमुख आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजप अध्यक्ष असल्यासारखं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “ललित पाटीलला अटक झाली १०/११ डिसेंबर २०२० मध्ये. जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी ललित पाटीलला नाशिकच्या शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. आता आश्चर्य बघा की, गुन्हा मोठा होता आणि ललित पाटीलला अटक झाल्यानंतर १४ दिवसांचा पीसीआर (रिमांड) मिळाला. पीसीआर मिळाल्याबरोबर ते ससूनला दाखल झाले. तसेच पूर्ण १४ दिवस पीसीआरमध्ये ससूनमध्ये दाखल होते. यावेळी सरकारी पक्षाकडून न्यायालयात आम्ही आरोपीची चौकशी केली नसल्याचं अथवा त्यांचा आजार योग्य नसल्याचं सांगत अर्जही करण्यात आला नाही.”

- Advertisment -

ताज्या बातम्या