Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यामराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार काय? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार काय? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. आजपासून मराठा आंदोलक गावोगावी उपोषण करणार आहेत. तर मनोज जरांगे यांचीही प्रकृती खालावली आहे. आरक्षणावर कोणताच तोडगा निघताना दिसत नाहीये.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार काय? असा संतप्त सवाल करतानाच आम्हाला वगेळी भूमिका घ्यायला लावू नका, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चूड लावत आहेत. मराठा समाज त्यांचा हक्क मागत आहे आणि त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा.

ओबीसी,आदिवासीसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे. जरांगे पाटील उपोषण करत आहेत पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचे मन निर्दयी आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या