Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Balasaheb Thackeray: उध्दव ठाकरेंना पुन्हा पक्ष फुटण्याची भीती? नवनिर्वाचित आमदारांबाबत घेतला...

Uddhav Balasaheb Thackeray: उध्दव ठाकरेंना पुन्हा पक्ष फुटण्याची भीती? नवनिर्वाचित आमदारांबाबत घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई | Mumbai
राज्यातील विधानसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचे पाणीपत झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात भाजप महायुतील तब्बल २३१ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. या निकालानंतर आता मविआला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही. यातच ऐतिहासिक बंडखोरीतून मोठा धडा घेत ठाकरे गटाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीच्या सत्तास्थापनेपुर्वीच शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून मोठी खबरदारी बाळगण्यात येत आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली असून आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत ठाकरेंकडून ही खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येते. मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत.

- Advertisement -

उध्दव ठाकरेंना पुन्हा पक्षफुटीची भीती?
उध्दव ठाकरेंनी या विधानसभा निवडणुकीत ९५ जागांवर उमेदवार उभे केले होते. पैकी केवळ २० ठिकाणी ठाकरे गटाला यश मिळाले. यानंतर मातोश्री येथे सर्व नवनिर्वाचित २० आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत उध्दव ठाकरेंनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समजते आहे. या बैठकीत नवनिर्वाचित २० आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार असून पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार, पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असतील, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. पक्षफुटीचा मोठा अनुभव घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीत सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भास्कर जाधव गटनेते असणार आहेत. तर विधानसभा, विधान परिषद या दोन्ही सभागृहांसाठी आदित्य ठाकरे सभागृह नेते असणार आहेत, याबाबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...