Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…

मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र, या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधकांवर टीका करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले होते. त्यानंतर आज मविआतील घटक पक्ष असणार्‍या ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Kerala Landslide : वायनाड भूस्खलनातील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत ‘इतके’ जण दगावले

आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असणाऱ्या संघटनेच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका माडंली. यावेळी ते म्हणाले की, “मागील महिन्यात संभाजीनगरमध्ये माझी भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने नाटक करून बैठक बोलावली. सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावे. नेत्यांना बोलवण्यापेक्षा त्यांना बोलवावे. सरकार आंदोलनावर पोळी भाजत आहेत. महाराष्ट्राची विल्हेवाट लावत आहेत.शिवसेनेची काही मदत हवी असेल ती मी करेल”, असे ठाकरेंनी म्हटले.

हे देखील वाचा : हावडा-मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाही. जसे बिहारला (Bihar) आरक्षण दिले होते ते न्यायालयाने (Court) रद्द केले. लोकसभेत हा प्रश्न सुटू शकतो.मी माझे खासदार सोबत द्यायला तयार आहे. सर्वांनी मग त्यात मराठा, धनगर आणि इतरांनी मोदींकडे जावे. कारण मोदी सातत्याने ते मागास समाजातून येतात असे सांगतात. गरिबीतील संघर्ष त्यांनी अनुभवला आहे त्यामुळे आरक्षणाबाबत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. ओबीसींच्या मर्यादा वाढवायच्या आहेत. धनगरांना आरक्षण देतांना आदिवासी आरक्षणाच्या मर्यादा वाढवायच्या, कुणाला दुखवायचे आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी सांगायला हवे. आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत काही तोडगा काढायचा असेल तर आमचा पक्ष त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे”, असेही त्यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...