Tuesday, January 6, 2026
Homeराजकीय"नराधमाला पाठिशी घालणारं विकृत सरकार…"; भर पावसात उद्धव ठाकरे संतापले

“नराधमाला पाठिशी घालणारं विकृत सरकार…”; भर पावसात उद्धव ठाकरे संतापले

मुंबई । Mumbai

बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधकांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

- Advertisement -

मुंबईतील शिवसेना भवनासमोर देखील ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हा महाराष्ट्र साधूसंताचा आहे. संस्कारक्षम महाराष्ट्र आहे. पण एका बाजूला विकृत, नराधम आणि त्यांच्यावर पांघरुण घालणारं विकृत सरकार त्या नराधमाची बाजू मांडणारे विकृत याचिकाकर्ते यांच्याविरुद्ध हा लढा आहे, असा हल्लाबोल केला.

YouTube video player

हे हि वाचा : पुण्यात भरपावसात शरद पवार, सुप्रिया सुळेंचं आंदोलन

उद्धव ठाकरे म्हणाले, मला या सरकारची कीव येते. नराधमांच्या विरोधात उभं राहण्याऐवजी ते त्यांच्यावर पांघरुण घालण्याचं काम करत आहे, पाठीशी घालत आहेत. नराधमांच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी होती. पण ज्या ज्या वेळी सर्व दरवाजे बंद होतात. त्यावेळी जनतेला रस्त्यावर उतण्याखेरीज पर्याय नसतो.

आज खरं तर महाराष्ट्र बंद कडकडीत झाला असता, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली. त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी आपले चेलेचपाटे कोर्टात पाठवले आणि अडथळे निर्माण केले. कोर्टाचेही आभार.. आम्हाला समजलं की आमच्या खटल्यासाठी दोन वर्ष तारीख पे तारीख सुरु आहे. पण ठरवलं तर कोर्ट एवढं त्वरेने हलू शकतं, हे समजलं. त्यासाठी कोर्टाचे अभिनंदन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे हि वाचा : स्थानिक गुन्हे शाखेत कोणालाच नियुक्ती मिळेना!

(सविस्तर वृत्त लवकरच…)

ताज्या बातम्या