Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याUddhav Thackeray : “मी फडतूस म्हणणार नाही, कलंक म्हणणार नाही, थापाड्याही...”; उद्धव...

Uddhav Thackeray : “मी फडतूस म्हणणार नाही, कलंक म्हणणार नाही, थापाड्याही…”; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं

हिंगोली | Hingoli

- Advertisement -

ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची आज हिंगोलीतील (Hingoli) रामलीला मैदानावर (Ramlila Maidan) निर्धार सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा डिवचल्याचे पाहायला मिळाले…

शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचं सोडून दिलं आहे. मी काहीही म्हटलं तरी त्याचा बोभाटा होतो. मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार. कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. त्यानंतर कार्यकर्त्यांमधून टरबूज असा शब्द आला. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी “टरबुजाच्या झाडालासुद्धा पाणी लागतं”,असं सांगत पुढे “मी असं काही म्हणत नाही, अजिबात म्हटलेले नाही.” असे म्हटले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत ठाकरेंच्या नावाचा जयघोष केला.

Eknath Shinde : “…अन् एका झटक्यात ऑनलाइनवाले लाईनवर आणले”; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, “भाजपमध्ये (BJP) सगळे आता आयाराम आहेत. अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी (Activists) आयुष्य खर्ची घातले आहे. परंतु ते फक्त सतरंज्या उचलण्यापुरते उरले आहेत. फडकतंय दुसरंच आणि निष्ठावानांच्या हाती दांडा उरला आहे. डबल इंजिन सरकारला आणखी एक अजितदादांचा डबा लागला आहे. तुमच्या पक्षात चांगले नेते नाहीत का? नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. तुमच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये मतं मागण्याची हिंमत नाही? असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. तसेच एनडीएचा (NDA) आता अमिबा झाला आहे. ज्यावेळी आम्ही इंडियाचे नाव घेऊन पुढे आलेलो आहोत. तेव्हा आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनबरोबर करता. आम्ही अतिरेकी आहोत का? आमच्याबरोबर असलेला शेतकरी अतिरेकी आहे का?” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, सकाळी…

ते पुढे म्हणाले की, “राज्यात दुष्काळ (Drought) पडलेला असताना फडणवीस जपानला (Japan) गेले. तिकडे डॉक्टरेट घेतली आणि परत आले. तुमचा हा प्रयत्न उत्तम आहे. परंतु, तुमच्या सरकारमध्ये जे प्रकल्प जपानला गेले ते माघारी आणाल का? मोदीजी म्हणाले होते मोठा उद्योग देतो, कुठेय उद्योग? जे उद्योग राज्यात आले होते. ते तुमच्या डोळ्यादेखत गुजरातला गेले. जपानऐवजी गुजरातला गेलेले ते उद्योग परत आणणार आहात का? गुजरात जवळ आहे जपानपेक्षा, ” असा चिमटाही ठाकरेंनी यावेळी फडणवीसांना काढला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? मुंबईतील बैठकीआधी कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती

- Advertisment -

ताज्या बातम्या