Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : "एक तर तू राहशील नाहीतर मी"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना...

Uddhav Thackeray : “एक तर तू राहशील नाहीतर मी”; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना गर्भित इशारा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) चांगले यश मिळाल्यानंतर मविआतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास चांगलाच वाढल आहे. तसेच मविआतील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून मुंबईतील रंग शारदा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्र सोडले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) गर्भित इशारा दिला आहे.

हे देखील वाचा : Yashashri Shinde Murder Case : आरोपी दाऊद शेखला पोलीस कोठडी; हत्येचे कारणही सांगितलं

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला.आता विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुर्मीही उतरवू. सगळं सहन करून मी उभारा राहिलो. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे. त्यामुळे यापुढे राजकारणात एकतर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहीन.आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही. पण शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी आव्हान देत आहे, असे ठाकरेंनी म्हटले.

हे देखील वाचा : Kerala Landslide : वायनाडमध्ये आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते मला भेटून गेले आहेत. अनेकजण म्हणाले की, उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई है. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत. अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला.

हे देखील वाचा : इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाचा भडका उडणार; हमासच्या प्रमुखाची हत्या

तसेच ग्रामीण भागामध्ये (Rural Area) चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला. काही जणांनी सांगितले की आम्हाला मतदान (Voting) करणार होते पण चुकून त्यांना दिले. मशाल चिन्ह घरोघरी पोहोचली पाहिजेत. जायचं आहे तर उघडपणे जा आणि आत राहून दगाबाजी करु नका. शिवसैनिकांना सोबत घेऊन लढून जिंकून दाखवीन, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या