Wednesday, June 26, 2024
Homeमुख्य बातम्याशासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

हिंगोली | Hingoli

- Advertisement -

हिंगोलीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिल्याच निर्धार सभेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. ‘राज्यात शेतकरी हवालदिल आहे, मात्र सरकार फिरत आहे. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लयभारी’. तसेच हे ‘डबल इंजिन’ सरकार हवेत थापांच्या वाफा सोडतंय, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काही जणांना अपेक्षा असेल मी गद्दरांवर बोलेन, पण मी गद्दरांवर वेळ घालवणार नाही. मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो असून, त्यावरच बोलणार आहे. मागे नागपंचमी झाली. आपण या गद्दाराला दूध पाजले पण त्याने पलटून चावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा सापांना पायखाली ठेचलं पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या