Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

ठाणे | Thane

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी आज प्रथमच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी शिंदे गटावर तोफ डागली आहे…

- Advertisement -

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, अन्यायावर लाथ मारा हे शिवसेनेचे (Shivsena)ब्रीदवाक्य आहेच. ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हे आपलं ब्रीद आहेच. आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) हीच शिकवण दिली आहे. ही शिकवण मानणारे अस्सल आणि कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. विकाऊ होते ते विकले गेले. काय भाव ते तुम्हाला माहित आहे, असे ठाकरेंनी म्हटले असता उपस्थितांनी ५० खोके एकदम ओके या घोषणा दिल्या. त्यानंतर ही घोषणा राहुल गांधींपर्यंत जम्मूलाही पोहचली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत राहिले आहेत हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत. तसेच आत्ता फक्त शिबिरासाठी आलो आहे, भाषण करायला नंतर येईल, ठाणेकरांच्या आरोग्याची विकृतांपासून काळजी घ्यायला आलो आहे, असे म्हणत ठाकरेंनी शिंदे गटावर निशाण साधला. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या