Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : "मीच तुझा भाऊ, सर्व फुकट खाऊ"; उद्धव ठाकरेंचा महायुतीवर...

Uddhav Thackeray : “मीच तुझा भाऊ, सर्व फुकट खाऊ”; उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरच्या (Shirdi and Chhatrapati Sambhajinagar)दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी त्यांनी दोन्ही ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना राज्यातील महायुती सरकारवर (Mahayuti Government) निशाणा साधला. यावेळी ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

हे देखील वाचा :   उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा तीन मजली इमारत कोसळली; नऊ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी पहिल्यांदा सर सरन्यायाधीशांच्या (Chief Justice) घरी पंतप्रधान गणपतीच्या आरतीसाठी आले. त्याकरिता त्यांचे आभार मानतो. कारण मोदी घरी येणार म्हणून गणपतीला (Ganpati) त्यांनी पुढची तारीख दिली नाही. शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्हाची सुनावणी सतत लांबणीवर जात असल्याने उद्धव ठाकरेंनी त्यावरून हा टोला लगावला.

दै. ‘देशदूत’चा ५५ वा वर्धापन दिन 2024 आरोग्यम् मुलाखत – विषय : परंपरागत आयुर्वेदालाही अनन्यसाधारण महत्व

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या सरकार आपल्या दारी नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यासाठी पैसे देऊन माता भगिनींना आणले जात आहे. तसेच लाडकी बहीण योजना आणल्यानंतर लाडका भाऊ कोण, हेच आता कळत नाही. भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणीला कळत नाही. कारण यांच्यात मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ,असे म्हणत सुटले आणि हे सर्व फुकट खाऊ आहेत” अशा ‘ठाकरी’ शब्दांमध्ये त्यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.

हे देखील वाचा : Sharad Pawar : “सत्तेचा माज काहींच्या डोक्यात…”; शरद पवारांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल

पुढे ते म्हणाले की, “माझ्या मनात रुक रुक आहे की, संभाजीनगरमध्ये लोकसभेला (Loksabha) आपला उमेदवार पडला. पण, गद्दाराने आपल्याला पाडावे ही खंत वाटते. आज माझे त्यांना आव्हान आहे, येऊ दे विधानसभा तुमच्या ढुंगणाला चूड लावल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर (Shinde Shivsena) हल्ला चढवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातच नाही जगात कुठेही झाला नाही. शिवरायांचा पुतळा पडला. मंदिर गळते, हे गळते, ते गळते, अशी अवस्था यांची आहे. त्यामुळे हे गळती सरकार आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

हे देखील वाचा : सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो; कोपरगावमध्ये उद्धव ठाकरेंचा कर्मचाऱ्यांना शब्द

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर सर्वांना सुखाचे दिवस येतील – राऊत

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचा भगवा वैजापूरमध्ये कायम आहे. जे ४० गद्दार गेले, त्यातला एक वैजापूरचा गद्दार आहे. हा गद्दरीचा कलंक काढायचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा भगवा झेंडा फडकावयाचा आहे. या राज्याच्या नेत्रतृत्वाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार आहेत. ११ कोटी जनतेचा लाडका नेता उद्धव ठाकरे हे आहेत. उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तेव्हाच सर्वांना सुखाची झोप लागेल. हे राज्य आम्हाला आमचे वाटत नाही. हे राज्य पुन्हा उभे करायचे आहे, असे त्यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या