Wednesday, April 16, 2025
Homeमुख्य बातम्याUddhav Thackeray : निर्धार मेळावा होऊ नये म्हणून दंगल घडवली - उद्धव...

Uddhav Thackeray : निर्धार मेळावा होऊ नये म्हणून दंगल घडवली – उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

नाशिक | Nashik

शहरातील मनोहर गार्डन लॉन्स येथे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) एक दिवसीय विभागीय निर्धार शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांच्या हस्ते पार पडले. तर शिबिराचा समारोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाला. यावेळी बोलतांना त्यांनी नाशिकमध्ये निर्धार मेळावा होऊ नये म्हणून दंगल घडवली असे म्हणत विविध विषयांवरून महायुतीवर चांगलाच हल्लाबोल केला.

- Advertisement -

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “बाळासाहेबांनी माझ्यामागे तुमच्या सारखी पुण्याई उभी केली याचा मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आपण असून, महाराष्ट्रात दिशा आपण ठरवू कुणी गद्दार ठरवू शकत नाही. महाराष्ट्रात कुणाची मस्ती खपवून घेतली जाणार नाही. आमची मुंबई लुटली जात असून गुजरातला सगळं नेलं जात आहे, हे आम्ही सहन करणार नाही”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने आम्हालाही वाटलं होतं की स्मारक होईल. मात्र, पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे शिवरायांचे भव्य स्मारक राज्यपाल भावनाच्या जागेवर उभे करा. शिवाजी महाराजांपेक्षा मोठे कोणीच असू शकत नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. चार दिवसांपूर्वी अमित शहा रायगडवर आले आणि त्यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की,’शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते सीमित ठेऊ नका.पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सूरत लुटली त्यावेळी त्याची बातमी ही लंडन गॅझेटमध्ये छापून आली होती. त्यामुळे अमित शाहांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये. भाजपला शिवाजी महाराजांबद्दल एवढंच वाटत असेल तर त्यांनी शिवजयंतीला देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी”, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

तसेच “शिवसेनेने हिंदुत्व सोडलं अशी बोंब मारणाऱ्या भाजपला सांगतो की, मी तुम्हाला सोडले हिंदुत्व सोडलेले नाही. शिवसेना नसती तर तुम्ही आयोध्येपर्यंत पोहोचू शकले नसते. भाजपने बिहारमध्ये ‘सौगात ए मोदी’च्या माध्यमातून ३२ लाख मुस्लिमांना भेटीचे वाटप केले. त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेले होते? म्हणजे महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे आणि बिहारमध्ये बाटेंगे तो जितेंगे असे यांचे धोरण आहे. मी मुख्यमंत्री असताना कसलाही भेदभाव केला नाही. मी केलेल्या कामांमुळे मुस्लिम लोक माझ्यासोबत आले आणि हे घाबरले”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दलित सर संघचालक करून दाखवावा

आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत ते बाहेर पडले. त्यांची एकूण वाटचाल पाहिली तर खूप खोलात जातील. मोदी म्हणतात की, काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष करुन दाखवावा. पण मला एक-दोन गोष्टी आवडल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, संघाने एक दलित समाजाच्या नेत्याला संरसंघचालक करुन दाखवावा. लावा ना, शर्यत. येत्या वर्षात संघाला १०० वर्ष होत आहेत. काँग्रेसचे सव्वाशे वर्ष होत आहेत. संघाचे आतापर्यंतचे सरसंघचालक आणि काँग्रेसचे प्रमुख यांची यादी काढा. कोण दलित होतं आणि कोण मुसलमान होतं के काढा आणि लोकांसमोर ठेवा. पण लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

नाशिकच्या विविध मुद्द्यांवरून सरकारला विचारला जाब

यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सरकारला विविध प्रश्नांवरून जाब विचारला. ते म्हणाले की, “नाशिकच्या पालकमंत्री पदाचा काय झालं? स्मार्ट सिटीचं काय झालं? शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय झालं? कोकाटे शेतकऱ्यांबद्दल कोकलत आहेत”, असेही ठाकरे यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Chief Justice Of India : भारताच्या सरन्यायाधीशपदासाठी संजीव खन्ना यांनी केली...

0
नवी दिल्ली | New Delhi देशाचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना (Sanjeev Khanna) हे १३ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर आता त्यांच्याजागी सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील (Maharashtra)...